मौजे सौंदरे ता . बार्शी येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी !!

मौजे सौंदरे ता . बार्शी येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी !!

 

प्रतिनिधी : लक्ष्मण उंबरदंड . सौंदरे येथे महात्मा बसवेश्वर जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली . यावेळी प्रमुख पाहुणे श्री प्रशांत कथले यांच्या शुभहस्ते मूर्ती ची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी पूजेसाठी माहेश्वर मूर्ती अशोक स्वामी यांनी वेदमंत्राचा उच्चार केला . तसेच या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर पंचायत समिती सदस्य राजेंद्र भाऊ सुरवसे धाराशिवचे गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड माजी ग्रा.पं . सदस्य चंद्रकांत कानगुडे . आडत व्यापारी नागनाथ गायकवाड . संतोष कोल्हे उपस्थित होते . सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान यांच्यावतीने सत्कार करण्यात आला .

 

यावेळी भाऊसाहेब आंधळकर व राजेंद्र भाऊ सुरवसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे दुपारी एक ते पाच महाप्रसाद अन्नदान व संध्याकाळी भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली .

 

यामध्ये शिवतांडव अघोरी नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले . हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गणेश पाटील सुयोग चिपडे उमेश कानडे रोहन कोल्हे नागेश आंधळकर योगेश कानडे पंकज चिवटे किरण ढवण संतोष चिपडे आकाश आंधळकर वसंत आंधळकर प्रमोद आंधळकर शशिकांत गोटे तसेच सर्व बसवेश्वर प्रतिष्ठान व समस्त सौंदरे ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतल .

 

 

 

मौजे सौंदरे ता . बार्शी येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी !! प्रतिनिधी : लक्ष्मण उंबरदंड . सौंदरे येथे महात्मा बसवेश्वर जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली . यावेळी प्रमुख पाहुणे श्री प्रशांत कथले यांच्या शुभहस्ते मूर्ती ची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी पूजेसाठी माहेश्वर मूर्ती अशोक स्वामी यांनी वेदमंत्राचा उच्चार केला . तसेच या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर पंचायत समिती सदस्य राजेंद्र भाऊ सुरवसे धाराशिवचे गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड माजी ग्रा.पं . सदस्य चंद्रकांत कानगुडे . आडत व्यापारी नागनाथ गायकवाड . संतोष कोल्हे उपस्थित होते . सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान यांच्यावतीने सत्कार करण्यात आला .

यावेळी भाऊसाहेब आंधळकर व राजेंद्र भाऊ सुरवसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे दुपारी एक ते पाच महाप्रसाद अन्नदान व संध्याकाळी भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली .यामध्ये शिवतांडव अघोरी नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले .

 

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गणेश पाटील सुयोग चिपडे उमेश कानडे रोहन कोल्हे नागेश आंधळकर योगेश कानडे पंकज चिवटे किरण ढवण संतोष चिपडे आकाश आंधळकर वसंत आंधळकर प्रमोद आंधळकर शशिकांत गोटे तसेच सर्व बसवेश्वर प्रतिष्ठान व समस्त सौंदरे ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले .