मंथन वेल्फेअर फाउंडेशन संचलित मंथन राज्यस्तरीय परीक्षा राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या व 2200 विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न
बार्शी –
सदर परीक्षेत सोलापूर धाराशिव लातूर जिल्ह्यातील तब्बल 787 विद्यार्थी बक्षीसाचे मानकरी ठरले. गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून झाली. शुभ हस्ते
कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर
1. उमेश देशमुख, निरीक्षक
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,
धर्मादाय उप आयुक्तालय, सोलापूर.
2.सचिन रणदिवे
तालुका क्रीडा अधिकारी, सातारा
3. विनोद काटे
सहाय्यक, आरोग्य विभाग, धाराशिव.
4. संतोष जाधव STI Barshi
5. रविकिरण चंद्रकांत रणसूबे
6. शिल्पा रजपूत Coordinator Sai Health Foundation pune
7.
8. सुनील जवंजाळ लेखक व ग्रामीण कवी
9. मा. श्री गणेश देशमुख साहेब
10. अमोल बाळासाहेब ताकभाते सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण धाराशिव
या सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित दर्शन कार्यक्रमाचे शोभा वाढवली
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंथन परीक्षा समन्वयक संभाजी नवले म्हणाले, आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धा परीक्षा हाच आपले ज्ञान अद्यावत ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. याद्वारेच आपण आपल्या ज्ञानाची पातळी दर्जा, उत्तमरीत्या पारखू शकतो म्हणूनच भविष्यात अनेक स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारीसाठी प्राथमिक अवस्थेत सामान्य ज्ञान पारखणाऱ्या प्रज्ञाशोध परीक्षा आवश्यक आहेत. मंथन वेल्फेअर फाउंडेशन ही एकमेव संस्था भविष्यकाळातील या सर्व आव्हानांचा विचार करून या परीक्षेचे आयोजन करते इतर मान्यवरांनी हे युग स्पर्धात्मक आहे स्पर्धात्मक युगामध्ये ज्ञानाची अचूक पातळी कशी गाठावी व तणाव विरहित ज्ञान कसे संपादित करावे यावर आपले मनोगत व्यक्त केले
प्रमुख पाहुणे सौ शिल्पा रजपूत मॅडम यांनी भाषणामध्ये पालकांनी आपल्या मुलांना ताण तणाव विरहित आनंदी शिक्षण घ्यावयास प्रोत्साहित करावे असे पालकांना आवाहन केले.
त्याचबरोबर ग्रामीण कवी माननीय श्री सुनील जवंजाळ सर त्यांची विनंती कविता सादर करून पालक व विद्यार्थी वर्गाचे मन जिंकले
या कार्यक्रमासाठी मंथन वेल्फेअर फाउंडेशन राज्य समन्वयक स्वप्नील थोरात सर हे देखील उपस्थित होते
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न.पा. शाळा क्रमांक 14 पंडित जवाहरलाल नेहरू शाळेच्या शिक्षिका सौ पल्लवी संभाजी नवले व सौ ज्योती अमोल नलावडे मॅडम यांनी केले.
श्री प्रसाद भारत देवराम तुम्ही आभार प्रदर्शन केले
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी ट्रॉफी व प्रमाणपत्र घेतल्यानंतर आपल्या परिवारासह सेल्फी पॉईंटचा आनंद घेतला. कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमातील सर्व विद्यार्थी व पालकांनी भोजनाचा आस्वाद घेऊन झाली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात करिता सोलापूर जिल्हा मंथन समन्वयक संभाजी नवले समाधान केदार दामाजी माळी भंडारे सर पांढरे सर तसेच हेल्थ क्लब बार्शी, प्रमोद ननवर, दिपक ढावारे, प्रवीण पवार सचिन जाधव, संतोष घावटे, लीना ठोंबरे अस्मिता माळी, अमृता चव्हाण, महानंदा काळे जितेंद्र घोडके रमेश कानडे, श्रीकांत मैड, राजेश गोडसे अनंत नेटके, प्रवीण पवार, मैत्री बहुउद्देशीय संस्था डॉ. अनिरुद्ध भुजबळ, डॉक्टर प्रीतम इंगळे मोरया क्रिकेट क्लब सागर सोत्रे, मिलिंद भालेराव
व सर्व शाळेतील शिक्षक वृंद या सर्वांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.