बार्शी तालुक्यात अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई; तिघांवर गुन्हे

बार्शी : बार्शी तालुका पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करत दोन ठिकाणी देशी-विदेशी दारू व हातभट्टी दारू जप्त केली. तसेच दारूच्या नशेत आयशर टेम्पो चालविणाऱ्या चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.

आगळगाव येथील धनगरवाडी परिसरात यंगु लक्ष्मण पवार (वय ६५) याच्याकडून ९ लिटर हातभट्टी दारू, किंमत ९०० रुपये, जप्त करण्यात आली. याच गावात निलाबाई शंकर चव्हाण (वय ६०) यांच्याकडूनही ९ लिटर हातभट्टी दारू, किंमत ९०० रुपये, जप्त करण्यात आली.

धसपिंपळगाव येथील पुलाजवळ संतोष अर्जुन धस (वय ५१) याच्याकडून रॉयल स्टॅग, क्लासिक गोल्ड व ढोकी संत्रा या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या तसेच हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल असा एकूण ७७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, अलिपूर हद्दीतील कुर्डूवाडी बायपास चौकाजवळ अमोल ज्ञानोबा उदारे (वय २८, रा. लातूर) हा आयशर टेम्पो दारूच्या नशेत चालविताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध मोटार वाहन अधिनियम कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या सर्व प्रकरणांचा पुढील तपास बार्शी तालुका पोलिसांकडून सुरू आहे.