- 🚨 महा पोलीस मित्र संघ (महाराष्ट्र राज्य) 🚨
आज भगवंत मंदिर, बार्शी येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमादरम्यान महा पोलीस मित्र संघ (महाराष्ट्र राज्य) चे तब्बल ८० पदाधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.
सर्व पदाधिकाऱ्यांनी शिस्त, संयम, सेवाभाव आणि जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घालून देत पोलीस प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. भाविकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन आणि शांतता राखण्यासाठी सर्वांनी अत्यंत तत्परतेने आपली जबाबदारी पार पाडली.
समाजहित आणि जनसेवा हेच आमचे ध्येय असून, “पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वासाचा मजबूत दुवा” म्हणून महा पोलीस मित्र संघ सातत्याने कार्यरत आहे. आजचा यशस्वी बंदोबस्त हा प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या निस्वार्थ सेवाभाव, शिस्त आणि समर्पणाची साक्ष देणारा ठरला.
या यशस्वी कार्यात सहभागी झालेल्या सर्व महिला व पुरुष पदाधिकारी, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा! 💐
“सेवा • सुरक्षा • सहकार्य”
महा पोलीस मित्र संघ (महाराष्ट्र राज्य)
जय हिंद! 🇮🇳