भगवंत महोत्सवात पत्रकारांचा सामाजिक उपक्रम; मोफत पाणी वाटपाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भगवंत महोत्सवात पत्रकारांचा सामाजिक उपक्रम; मोफत पाणी वाटपाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बार्शी : बार्शीचे आराध्य दैवत श्री भगवंत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी लगबग सुरू असताना ‘डिजिटल मीडिया पत्रकार (संघ) असोसिएशन’तर्फे भाविकांसाठी मोफत पाणी वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. महोत्सवासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला.

या उपक्रमास माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या सामाजिक जाणिवेचे आणि जबाबदारीचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे नमूद केले.

उन्हाच्या तीव्रतेतही भाविकांना दिलासा देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पत्रकार संघाच्या या सामाजिक बांधिलकीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.